गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर फेल माशाचे एक पिल्लू वाहून आले असून मागील 30 तासापासून त्याला वाचवण्यासाठी तेथील लोक शर्तीचे प्रयत्न करत आहेत. पाच टन वजन असलेला हा मासा तब्बल वीस फूट लांबीचा आहे. असा अवाढव्य मासा पाहण्यासाठी तेथील पर्यटक स्थानिक नागरिक आणि एक्सपर्ट यांनी गर्दी केली आहे. या सर्वांच्या मदतीने एमटीडीसीच्या अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांनी मिळून यावेळी माशाच्या पिलाला वाचवण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत.
बचाव कार्यात अडथळे समुद्रात ओहोटी असल्यामुळे येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हेल वर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. तर मोठ्या जहाजाची मदत घेत त्याला समुद्रामध्ये सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत.