जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

वृक्षदिंडी मराठी निबंध; वृक्षदिंडी निबंध मराठी | VrukshDindi Marathi Essay

वृक्षदिंडी मराठी निबंध | VrukshDindi Marathi Essay: पर्यावरणाचा प्रश्न आज जागतिक समस्या बनला आहे. प्रदूषणाचे बळी केव्हा होऊ हे आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ओळखून आमच्या शाळेने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले आहे. 5 जून 'पर्यावरण दिन' निमित्त आम्ही 'वृक्षदिंडी' हा कार्यक्रम आमच्या शाळेने आयोजित केला. त्यासाठी उन्हाळी सुट्टीला जात असताना आम्हाला एक रोपटे लावायला सांगितले. आम्ही ते घरी एका कुंडीमध्ये रोपटे तयार केले. 5 जून रोजी आम्ही वृक्षदिंडि कार्यक्रमासाठी शाळेमध्ये जमलो. शाळेमधून आम्ही सर्वजण मिळून गावामध्ये ते वृक्ष घेऊन दिंडी काढली. (वृक्षदिंडी निबंध मराठी)


आज पर्यंत शाळेमध्ये अनेक प्रसंगानिमित्त वेगवेगळ्या मिरवणुका निघल्या होत्या मात्र वृक्षदिंडीसाठी निघालेली मिरवणूक ही एक आगळी वेगळीच होती. बऱ्याच मुलांच्या हातामध्ये खोरे आणि कुदळ होते काही जण पाणी घेऊन आमच्या सोबत चालत होते. गावांमध्ये प्रभात फेरी काढल्यानंतर घरामध्ये काही जणांच्या ज्यांच्या घरासमोर जागा आहे अशांना आम्ही ती झाडे दिली. ग्रामपंचायत च्या जागेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही मिळून ती झाडे लावली.

गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा अर्धा किलोमीटर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आम्ही ती झाडे लावली. उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही ज्या झाडांची जोपासना केली होती त्या झाडांची लागण करत असताना आम्हाला होणारा आनंद एक वेगळाच होता. मिरवणुकीमध्ये आम्ही वेगवेगळ्या घोषणा दिल्या. झाडे लावा...झाडे जगवा,  प्रदूषणाचा नाश करा. घरोघरी झाड... प्रदूषणावर करू मात. आजचे बालतरु... उद्याचे कल्पतरू अशा घोषणा आम्ही या वृक्षदिंडी मध्ये देत होतो. काही विद्यार्थ्यांनी वृक्षासारखे ड्रेस तयार करून घातले होते. काही विद्यार्थी हातामध्ये फलक घेऊन संपूर्ण गावांमध्ये मोठमोठ्याने घोषणा देत फिरत होते.

गावातील उत्साही मंडळी देखील आम्हाला मदत करत होते संपूर्ण गावांमध्ये आमची वृक्षदिंडी फिरत शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे विद्यार्थ्यांनी झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केली. आळी तयार करून त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापली झाडे लावली. शाळेचे गुरुजी आणि मुख्याध्यापक यांनी देखील या वृक्षदिंडीत आणि वृक्षारोपणामध्ये भाग घेतला. 

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या