नशीब हा शब्द मराठी भाषेत रूढ आहे. बरेच जण हा नशिबाचा खेळ आहे. त्याच्या नशिबात काय आहे ते त्याला मिळेल. त्याच नशीब खूप चांगलं आहे. मला नशीबाने आज साथ द्यावी. असे बऱ्याच वेळेस नशीब हा शब्द ऐकतो. मात्र नशीब म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाहीय. चला तर जाणून घेऊ नशीब म्हणजे काय? आणि त्याचे समानार्थी शब्द.
नशीब म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भाग्यात ती गोष्ट असते. समजा माझी आज परीक्षा आहे मात्र माझा अभ्यास थोडा कच्चा आहे. अश्यावेळी जर मला परीक्षा सोपी गेली तर माझ्या तोंडातून लगेच विधान निघेल माझ्या नशिबात लिहल होत. त्यामुळे पेपर सोपा गेला. म्हणजे काय जास्त कष्ट न घेता मला ती गोष्ट मिळाली.
नशीब या मराठी शब्दाला दैव, विधिलिखित, नियती, भाग्य, ललाटलेख असे अनेक समानार्थी शब्द आहेत.