1. औपचारिक पत्र
2. अनौपचारिक पत्र
आपल्याला इयत्ता नववी किंवा दहावीच्या दृष्टीने अभ्यास करायचा असेल तर औपचारिक पत्र महत्त्वाचे आहे. आज आपण येथे औपचारिक पत्र अभ्यासणार आहोत.
औपचारिक पत्रामध्ये तीन प्रकारचे पत्र लिहिता येतात.
1. मागणी पत्र
2. विनंती पत्र
3. अभिनंदन पत्र
आता आपण उदाहरणाद्वारे पत्र कसे लिहायचे हे समजावून घेऊया.
प्रश्न. पुढील निवेदन वाचा आणि त्या खालील कृती सोडवा.
________________________________________
🌱'झाडे लावा.. झाडे जगवा'🌱
हिरवाई ट्रस्ट, सातारा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
दिनांक 5 जून रोजी
मोफत रोपांचे वाटप
संपर्क: हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, सातारा
________________________________________
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
🌱 शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
🌱 या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
वरील पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता या प्रश्नासाठी उत्तर कसे लिहायचे ते आपण पाहायचे आहे.
पत्र लिहीत असताना प्रथमता आपल्याला दिनांक लिहावा लागेल. त्यानंतर पत्र स्वीकारण्याचे नाव आणि हुद्दा लिहावा लागेल. त्यानंतर पत्राचा विषय काय आहे तो लिहावा लागेल. त्यानंतर अभिवादन करून पत्राला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर पत्राचा मजकूर लिहायला सुरुवात करायची आहे. पत्राचा मजकूर लिहून झाल्यानंतर पत्राचा शेवट करायचा आहे. त्यानंतर पत्र लेखकाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर पत्र लेखकाचा पत्ता लिहायचा आहे. म्हणजे स्वतःचा पत्ता लिहायचा आहे.
पत्रलेखन मराठीमध्ये करा असे
दिनांक: 3 जून 2023
प्रति,
संचालक,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
सातारा.
विषय: पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणेबाबत.
माननीय महोदय,
जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी आमच्या विद्यालयामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनाची निर्मिती सादर आपण शाळांना मोफत रोपांचे वाटप करणार आहात. याबाबतची जाहिरात आपल्या ट्रस्टने केलेली आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही शाळेमध्ये वृक्षारोपण दिन साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आमच्या शाळेला रोपांची गरज आहे.
वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी रोपे आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधीला तिकडे पाठवावे लागेल का? किंवा आपण आपल्या ट्रस्टमार्फत शाळेच्या पत्त्यावर ती रोपे पाठवू शकाल का? याबाबतची माहिती आम्हाला कळवल्यास उपयोगी ठरेल.
वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या विविध झाडांची माहिती येथे जोडत आहे.
________________________________________
रोपांचे प्रकार | रोपांची संख्या
विविध औषधी रोपे | 30
फुलझाडे | 55
निलगिरी | 40
अशोक | 40
________________________________________
आपला कृपाभिलाषी ,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
विद्यादीप विद्यालय,
सातारा
abc2023@gmail.com