पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता व दिनांक
मायना
विषयानुसार मजकूर
योग्य समारोप

अ.ब.क.
गंगा निवास,
ढवळी, ता. मिरज
जि. सांगली 416 410

दिनांक: 29 ऑक्टोंबर, 2023

प्रति,
मा. वर्गशिक्षक
ढवळी हायस्कूल,
ढवळी, ता. मिरज,
जि. सांगली 416 410

विषय: कौटुंबिक कारणास्तव शाळेत चार दिवस अनुपस्थित राहण्यास परवानगी मिळणेबाबत

सर,
मी अ.ब.क इयत्ता आठवीमध्ये शिकत असून आपणास सांगू इच्छितो की आमच्या घरी लग्नकार्य असल्याने मी पुढील 4 दिवस उपस्थित राहू शकणार नाही. येत्या बुधवारी आमच्या घरी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्नकार्य आयोजित केले आहे. घरात बाबा एकटेच असल्याने लग्नकार्यास माझ्या मदतीची गरज आहे.

पुढील 4 दिवसात माझ्या अभ्यासाचे नुकसान होऊ देणार नाही. माझा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करून देईन याची खात्री देतो. सर्व विषयांचा गृहपाठ लवकर पूर्ण करेन.  

मला खात्री आहे, माझी अडचण तुम्ही समजून घेऊन पुढील 4 दिवस अनुपस्थित राहण्याची परवानगी द्याल. 

आपला विद्यार्थी,
अ.ब. क.
इयत्ता आठवी