🤨 पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एक महत्वाची माहिती देत एलपीजी सिलेंडर वितरकाची निवड ग्राहक स्वतः करू शकणार असल्याचं सांगितलं.
चला तर नेमकी काय आहे प्रक्रिया जाणून घेऊ
ग्राहक करणार वितरकाची निवड
पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की मोबाइल अॅपद्वारे किंवा ओएमसी वेब पोर्टलद्वारे लॉग इन करुन ग्राहक वितरकाची निवड करू शकतात. तसेच ग्राहक सिलिंडर वितरित करणार्याचे रेटिंग देखील पाहण्यास ग्राहक सक्षम असतील.
तर हे रेटिंग मागील कामगिरीच्या आधारे निश्चित केले जाईल. जर अशा परिस्थितीत वितरकाचे रेटिंग खराब झाल्यास ग्राहकास दुसरा एलपीजी वितरक निवडण्यास सक्षम असणार आहे.
याबरोबर तेल कंपन्यांच्या मोबाइल अॅप किंवा पोर्टलवर वितरकांची यादीही देण्यात येणार आहे. ग्राहकांना सिलिंडर वितरणासाठी त्यांच्या क्षेत्राच्या वितरकाच्या नावावर क्लिक करावे लागेल.
अन्य शहरांमध्ये ही योजना कधी लागू होणार
पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदीगढ, कोयंबतूर, गुरुग्राम, पुणे आणि रांची येथील ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल, असे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने म्हटले आहे. या शहरांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यास ती देशातील इतर शहरांमध्येही लागू केली जाईल.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..