संत नामदेव यांचा जन्म शके 1192 (इ.स.1270) ला झाला संत नामदेव यांच्या जन्म स्थानाबद्दल वाद असून नरसी बामणी काय पंढरपूर हा वादाचा विषय आहे बऱ्याच तज्ञांच्या मते त्यांचे जन्मस्थान हे पंढरपूर मानले जाते. नामदेवांचे आडनाव रेळेकर होते.
नामदेवांनी शके 1272 म्हणजे तीन जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्या वर 54 वर्षांनी समाधि घेतली.
संत नामदेवांच्या वडिलांचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गोणाई होते. यांचा व्यवसाय शिंपी म्हणजे कपडे शिवणे होता..
संत नामदेवांचे अध्यामिक गुरू विसोबा खेचर होते. ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, विसोबा खेचर, या संतान सोबत शके 1213-17 यादरम्यान भारताचे तीर्थयात्रा केली. ज्ञानेश्वरांच्या भावंडांनी आणि चांगदेवांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुन्हा भारत यात्रेवर निघाले. या काळात त्यांनी पंजाब मध्ये वास्तव्य केले. येथे हिंदी भाषेमधून अभंग रचना केली. याद्वारे त्यांनी उत्तर भारतामध्ये शिष्य परंपरा निर्माण केली तर नामदेव हे उत्तर भारतामध्ये शिष्य परंपरा निर्माण करणारे एकमेव मराठी संत आहेत. गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथांमध्ये नामदेवांचे काही अभंग समाविष्ट आहेत. पंजाब मध्ये नामदेवांचे देवळे आजही पाहायला मिळतात. नामदेवांनी गवळणी आणि विराण्या लिहिलेले आहेत या खूप प्रसिद्ध आहेत तसेच भक्ती कारुण्य व काव्य असणारे रसाळ अभंग नामदेवांनी लिहिले आहेत. त्यांनी व्रज भाषांमध्ये काव्ये रचली आहेत.
संत नामदेवानी अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) लिहिली आहे. तर त्यांनी हिंदी भाषेमध्ये काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली आहे. यातले शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) गुरुमुखी लिपीमध्ये घेतलेले आहेत.
नामदेवांचा गौरव 'ज्ञानेश्वरांचे समकालीन ज्ञानेश्वर चरित्रकार' असे सुद्धा केले जाते तर त्यांनी लिहिलेली 'नामदेवाची गाथा' हे ज्ञानेश्वर चरित्राचे एक महत्त्वाचे साधन आहे. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथामधील तीन अध्यायांमधून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
नामदेवांना 'आद्य आत्मचरित्रकार' असेही म्हटले जाते कारण नामदेवांच्या वांग्मयातून स्वतःची म्हणजे त्यांची सुद्धा माहिती मिळते.