Tense Chart (काळ व त्याचे प्रकार Marathi Grammar / Tense in Marathi )
- इंग्रजी भाषेत एकूण तीन काळ आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत.
1) Present tense - वर्तमानकाळ
2) Past tense-भूतकाळ
3) Future tense- भविष्यकाळ
या तीन मुख्य काळांचे क्रियेवरुन प्रत्येकी चार प्रकार पडतात, ते पुढीलप्रमाणे-
- Present tense - वर्तमानकाळ
1) Simple Present tense - साधा वर्तमानकाळ
2) Present Progressive tense - अपूर्ण वर्तमानकाळ
3) Present Perfect tense - qui ad417010
4) PresentPerfect Progressive tense-चालू पूर्ण वर्तमानकाळ
- Past tense - भूतकाळ
1) Simple Past tense-साधा भूतकाळ
2) Past Progressive tense- अपूर्ण भूतकाळ
3) Past Perfect tense- पूर्ण भूतकाळ
4) Past Perfect Progressive tense - चालू पूर्ण भूतकाळ
- Future tense - भविष्यकाळ (भविष्य काळ व त्याचे प्रकार)
1) Simple future tense - साधा भविष्यकाळ
2) Future Progressive tense- अपूर्ण भविष्यकाळ
3) Future Perfect tense - पूर्ण भविष्यकाळ
4) Future Perfect Progressive tense - चालू पूर्ण भविष्यकाळ
वरील तीन मुख्य काळांचे प्रत्येकी चार उपप्रकारात आपण to write क्रियापद चालवू व
प्रत्येक उपप्रकाराची रचना वैशिष्टये समजावून घेऊ.
Tense Meaning in Marathi
Present tense - वर्तमानकाळ
1) Simple Present Tense Meaning - साधा वर्तमानकाळ
e.g. I write a letter
मी पत्र लिहितो.
वर्तमान काळातील वाक्याची वैशिष्ट्ये :
1) साध्या वर्तमान काळातील वाक्यात मूळ क्रियापद वापरले जाते.
2) साध्या वर्तमान काळातील वाक्याची रचना पुढीलप्रमाणे असते.
Tense Formula
कर्ता + क्रियापद + कर्म
3) साध्या वर्तमानकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनाम जर तृतीय पुरुषी एकवचनी पुल्लींगी, स्त्रील्लिंगी किंवा नपुसक लिंगी (He, she,it) असेल तर त्यापुढे येणाऱ्या
मूळ क्रियापदास 'es' किंवा 's' हा प्रत्यय लागतो.
2) Present Progressive(Continues) tense - अपूर्ण वर्तमानकाळ
Tense Examples-
I am writing a letter
मी पत्र लिहित आहे.
- अपूर्ण वर्तमान काळातील वाक्याची वैशिष्टये :
1) अपूर्ण वर्तमान काळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनामापुढे am, is, are यापैकी एक to be चे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.
2) सहाय्यकारी क्रियापदापुढे येणाऱ्या मूळ क्रियापदास ing हा प्रत्यय जोडला जातो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) वाक्य रचना पुढील प्रमाणे असते. -
कर्ता + am,is, are + क्रियापद + ing + कर्म.
3) Present perfect tense - पूर्ण वर्तमानकाळ
eg. I have written a letter.
मी पत्र लिहिले आहे.
- पूर्ण वर्तमान काळातील वाक्याची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत. : (tense grammar in marathi)
1) पूर्ण वर्तमान काळातील वाक्याता किंवा सर्वनामानंतर has किंवा have चा वापर
केलेला असतो.
2) Has किंवा have नंतर क्रियापदाचे तिसरे रुप वापरलेले असते.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) पूर्ण वर्तमानकाळातील वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते. -
कर्ता + has / have+ क्रियापदाचे तिसरे रुप + कर्म.
4) Present Perfect Progressive tense-चालू पूर्ण वर्तमानकाळ.
e,g. I have been writing a letter.
मी पत्र लिहित आलेलो आहे.
चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्याची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत.
1) चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनामानंतर has been किंवा have been वापरलेले असते.
2) has been किंवा have been नंतर येणाऱ्या मूळ क्रियापदास 'ing' हा प्रत्यय जोडलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्याची रचना ही पुढील प्रमाणे असते.
कर्ता + have been / has been क्रियापद + ing + कर्म.
Past tense- भूतकाळ
1) Simple Past tense - साधा भूतकाळ
eg. I wrote a letter.
(मी पत्र लिहिले.) साध्या भूतकाळ कार्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. :
1) साध्या भूतकाळी वाक्यात कर्ता किंवा सर्वनामा नंतर क्रियापदाचा भूतकाळ वापरलेला असतो.
2) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
3) साध्या भूतकाळातील वाक्याची रचना.
कर्ता + क्रियापदाचा भूतकाळ + कर्म.
2) Past Progressive tense - अपूर्ण भूतकाळ
e.g. I was writing a letter.
मी पत्र लिहित होतो.
अपूर्ण भूतकाळातील वाक्य ची वैशिष्ट्ये.
1) अपूर्ण भूतकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनाम नंतर was were ही to be ची भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात.
2) was/were पुढे येणाऱ्या क्रियापदास ing हा प्रत्यय अपूर्ण क्रिया दर्शविण्यासाठी जोडलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) अपूर्ण भूतकाळातील वाक्याची रचना ही पुढील प्रमाणे असते.
कर्ता + was/were+ क्रियापद + ing + कर्म.
3) Past Perfect tense- पूर्ण भूतकाळ
e.g. Had written a letter.
मी पत्र लिहिले होते.
पूर्ण भूतकाळातील वाक्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
1) पूर्ण भूतकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनामा नंतर had वापरलेले असते.
2) had नंतर क्रियापदाचे तिसरे रुप किंवा क्रियापदाचा भूतकाळ वापरलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) पूर्ण भूतकाळातील वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते.
कर्ता + had + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म.
4) Past Perfect Progressive tense - चालू पूर्ण भूतकाळ.
e.g. I had been writing a letter.
मी पत्र लिहित आले होतो.
चालू पूर्ण भूतकाळातील वाक्य ची वैशिष्ट्ये ही पुढीलप्रमाणे आहेत.
1) चालू पूर्ण भूतकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनामा नंतर had been वापरलेले असते.
2)had been नंतर येणाऱ्या क्रियापदास अपूर्ण क्रिया दर्शविण्यासाठी 'ing' हा प्रत्यय जोडलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) चालू पूर्ण भूतकाळातील वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते.:
कर्ता + had been + क्रियापद + 'ing' + कर्म.
Future tense-भविष्यकाळ
1) Simple future tense-साधा भविष्यकाळ
e.g. I shall write a letter.
मी पत्र लिहिन
साध्या भविष्य काळातील वाक्याची वैशिष्टये ही पुढीलप्रमाणे आहेत.
1) साध्या भविष्य काळातील वाक्यात I व we या प्रथम पुरुषी एकवचनीव अनेकवचनी सर्वनाम पुढे shall व इतर सर्वनामांसमोर will हे to be चे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरलेले असते.
2) Shall किंवा will नंतर मुळ क्रियापद वापरलेले असते.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) साध्या भविष्यकाळातील वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते.
कर्ता + Shall/will + मूळ क्रियापद + कर्म.
2) Future Progressive tense - अपूर्ण भविष्यकाळ
e.g. I shall be writing a letter.
मी पत्र लिहित असेन.
अपूर्ण भविष्यकाळातील वाक्याची वैशिष्टये ही पुढीलप्रमाणे आहेत.
1) अपूर्ण भविष्यकाळातील वाक्यात I आणि we या दोन सर्वनामांपुढे shall be व इतर सर्वनामांसमोर will be वापरले जाते.
2) Shall be/will be पुढे येणाऱ्या क्रियापदास 'ing' हा प्रत्यय जोडलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) अपूर्ण भविष्यकाळातील वाक्याची वाक्यरचना ही पुढीलप्रमाणे असते.
कर्ता + Shall be/will be + क्रियापद + ing कर्म.
3) Future Perfect tense- पूर्ण भविष्यकाळ
e.g. I shall have written a letter.
मी पत्र लिहिलेले असेल.
पूर्ण भविष्यकाळातील वाक्य ची वैशिष्ट्ये ही पुढीलप्रमाणे आहेत.
1) पूर्ण भविष्यकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनाम नंतर shall have किंवा will have वापरलेले असते. I आणि we या प्रथमपुरुषी एकवचनी व अनेकवचनी सर्वनाम पुढे shall have व इतर सर्वनाम यापुढे will have वापरलेले असते.
2) Shall have किंवा will have नंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरलेले असते.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) पूर्ण भविष्यकाळातील वाक्य वाक्यरचना ही पुढीलप्रमाणे असते.
कर्ता + shall have/ will have + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म.
4) Future Perfect Progressive tense - चालू पूर्ण भविष्यकाळ
e.g. I shall have been writing a letter.
मी पत्र लिहित आलेलो असेन.
चालू पूर्ण भविष्यकाळातील वाक्य ची वैशिष्ट्ये ही पुढीलप्रमाणे आहेत:
1) चालू पूर्ण भविष्यकाळातील वाक्यात कर्ता किंवा सर्वनामानंतर shall have been किंवा will have been वापरलेले असते. I आणि we या प्रथमपुरुषी एकवचनी अनेक वचनी सर्वनामांपुढे shall have been आणि इतर सर्व सर्वनामांपुढे will have been वापरलेले असते.
2) Shall have been किंवा will have been नंतर येणाऱ्या क्रियापदास ing' हा प्रत्यय अपूर्ण क्रिया दर्शविण्यासाठी जोडलेला असतो.
3) वाक्याच्या शेवटी कर्म येते.
4) चालू पूर्ण भविष्यकाळातील वाक्याची वाक्यरचना ही पुढीलप्रमाणे असते.
कर्ता + Shall have been / will have been + क्रियापद + ing + कर्म